युवा उद्योजक

युवा उद्योजक



भारत हा युवकांचा देश आहे . युवाशक्ती हीच देशाची खरी संपत्ती असेल तर तिने उद्योग उभा करून संपत्ती मिळवावी, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे तेव्हाच 'युवा उद्योजकांचा देश' म्हणून भारताची नवी ओळख बनेल . परंतु त्यासाठी गरज आहे मानसिकता बदलण्याची . ही नवीन मानसिकता साकारून काम करणारे आमचे संघर्ष ढोल ताशा पथक.

ज्याचे मुख्य उद्दिष्ट युवकांना स्वावलंबी व एकत्रित करण्याचे असुन त्याद्वारे युवा पिढीला योग्य दिशा दाखवणे आहे. प्रत्येक वेळेला घरून शे दोनशे रुपये घेणे हे आता योग्य वाटत नाही कारण आमच्यासाठी आमच्या आई - वडिलांचा चाललेला संघर्ष, आता आम्हाला बघवत नाही. आमचे ध्येय मुळातच दोन हातात मावेल एवढं स्वत:ला घेऊन उरलेलं समाजहितासाठी उपयोगात आणणे आहे. त्याच बरोबर नोकरी करणाऱ्यांना नोकरी देण्याचे काम आता लवकरच सुरू होईल आणि त्या दिशेनेच पुन्हा सुरू केलेली ही नवीन वाटचाल, एका नवीन संस्कृतीची सुरूवात "उद्योग संस्कृती".

या संस्कृती अंतर्गत आणि संघर्ष कट्ट्याच्या माध्यमातून जिव्हारी बाळगलेले भविष्यातील मराठी उद्योजक होण्याच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाकत आम्ही दिवाळी-२०१८ मध्ये 'युवा उद्योजकांचे' संघर्ष फटाका स्टॉल हा उद्योग सुरू केला.

त्यासोबतच आमच्या ताई दादांनी स्वतः पणती डिझाइन केल्या, आकाशकंदील बनवून विकले. त्यांच्या अंगी असलेल्या कला गुणांना वाव देत एक छोटा उद्योग उभारला. आणि हे सर्व शक्य झाले ते उत्कृष्ट Teamwork.. Dedication.. Faith या गोष्टींमुळे.

तसेच, आमच्या या नवीन वाटचालीस सर्वांनी जो भरघोस प्रतिसाद दिला त्यासाठी सर्वांचे मनस्वी आभार.

यातून आम्हाला काय शिकायला मिळाले सांगायचे झाले तर, एका ओळीत व्यक्त करता येईल.. आकांक्षा पुढती गगन ठेंगणे!