ट्रेक

Photostream - Treks


Created with flickr slideshow.


ट्रेकिंग

वादना व्यतिरिक्त ट्रेकिंग हा सर्वांचा आवडता उपक्रम आहे. ट्रेकिंग मुळे संघर्ष परिवार एकत्रित येऊन ट्रेकिंगचा आनंद घेत गडसंवर्धन करत पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतात.

राजगड

२०१४ : शिवकालीन राजधानी असे बिरूद मानाने मिरवणाऱ्या गडाधिपती राजगडाची शान काही औरच. अनेक जणांनी पहिल्यांदाच केलेल्या या गिर्यारोहणाने त्यांना प्रचंड आनंद आणि आत्मविश्वास दिला.

२३-२४ जुलै २०१६ : राजगड ट्रेक........ खुप मस्त होता........... टँपो ट्रव्हलीग... टँपोमधे मजा-मस्ती.….. ट्रेक मधे गँस गेणे...मधेच चहा-बुश अाणि मनोदीप दादा चे गाणी....गडावर चोर दरवाजा च्या वर डान्स झिंगाट....नंतर गरमा गरम बोबी....मग राईस (भात),जेवन ... सैराट-२ शुटीग .... सकाळी पोपकोन, चहा....मग बाल्लेकिल्ला तिथे मज्जा-मस्ती-फोटो....नंतर चपाती चीवडा......मज्जाच मज्जा... ट्रेक मधे डान्स करने, मज्जा करने, स्पेशलि फोटो काढने....खरच खुप मस्त होते......... ट्रेक मधे जर माजाकडुन मजा-मस्ती करताना कुनाला काही चुकुन बोल्लो असेल तर शमा असावी...खास करुन आमच्या - अर्चना ताई,संगीता हळनोर काकु,पुजा ताई,स्नेहल ताई,पुजा (पवले) ताई,अभिषेक भाऊ, आणि नविन जुने सर्व ताई आणि दादा...... काही नाही आयुष्यात अशिच मज्जा करा

तिकोना

दिनांक १ जानेवारी 2015,
काही लोकांसाठी हा मज्जा मस्ती करण्याचा दिवस असेल, पण संघर्षाने मात्र एक वेगळा उपक्रम केला.....
वर्षाचा पहिला दिवस आमच्या लाडक्या संदीप दादाचा वाढदिवस साजरा करणे या हेतूने दुर्ग तिकोना या गडाला भेट दिली आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या साक्षीने गडसंवर्धनाचा ध्यास घेतला..... संस्कृतीचा वारसा जपण्याचा एक प्रयत्न......

हरिश्चंद्रगड

माणसाला जर. आपण खुप महान आणि मोठे झालो असे वाटायला लागलं तर त्याने एकदा हरिश्चंद्र गडाला नक्की जाऊन यावे आकाशाला भिडणारे काळे पाषाण हृदयात धडकी भरवतात. आपल्या खुजेपणाची जणू आपल्याला जाणिवच करून देतो. याही वेळी सांघिक भावना कामी आली.

राजमाची

लोणावळा पासून थोड्या अंतरावर असणारा राजमाची दुर्ग! पावसाळ्यात निसर्ग-सौंदर्य खूपच सुंदर.....

लोहगड

नावाप्रमाणेच लोहासारखा कणखर आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांचे सौंदर्य कायम टिकवून ठेवणारा लोहगड आजही तसाच दिमाखात उभा आहे. या किल्याला भेट देणं, त्याच रूप पाहणं आणि अशा या अफलातून किल्याचा वारसा जपणं हेच आमचे कर्तव्य...

कात्रज ते सिंहगड (K2S)

कात्रजच्या घाटातून सुरू केलेला ट्रेक आणि पार करण्यासाठी १७ लहान मोठे डोंगर. शारिरिक क्षमतेचा अंदाज पुर्णपणे घ्यायची हिच सर्वात मोठी संधी. संघभावनेचं महत्तव काय आहे ते या ट्रेकने अनेक जणांना शिकवलं.