सामाजिक कार्यक्रम

Memories in clicks


Created with flickr slideshow.


रक्तदान

संघर्ष परिवारामध्ये रक्तदान हे एका वेगळ्या पद्धतीने केले जाते. इथे इतर ठिकाणांप्रमाणे रक्ताची साठवण केली जात नाही, तर रक्तदात्यांच्या रक्त गटाची नोंदणी केली जाते. या मागची संकल्पना अशी की कधी एखाद्या गरजू व्यक्तीला रक्ताची गरज असेल तर संघर्ष थेट रक्तदान करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून त्या गरजू व्यक्तीची मदत करेल. याने रक्तदान करणारी व घेणारी व्यक्ती यांच्यात एक नाते तयार होते व ते एकमेकांना ओळखू लागतात व वेळ प्रसंगी ते एकमेकांच्या कामी येतात.

गडसंवर्धन

जेव्हा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो तेव्हा मनात एक प्रश्न आला की काय करतो आपण आपल्या राजासाठी आणि राज्यांच्या गडासाठी? एक छोटा प्रयत्न, शिवरायांची आठवण करून देणाऱ्या गडांचे गडसंवर्धन.

आपल्या शिवरायांच्या काळात कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्त्या केल्याचे आठवत नाही, असे जगातील सर्वोत्तम प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज. या उपक्रमाद्वारे आम्ही १५० दारूच्या बाटल्या तंबाखू, गुटखा, सिगारेट, कचरा इत्यादी गडावरून गोळा करून गड स्वच्छ करण्याचा छोटा प्रयत्न् केला त्याच प्रमाणे अस्थाव्यस्थ असलेल्या दगडांच्या साह्याने येथील झाडांना कुंपण केले.

दुष्काळग्रस्तांना मदत

आन्ध्रूड येथील चारा छावणीतील २०१३ साली दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात आली.

नवचेतना चारीटेबल ट्रस्ट व संघर्ष परिवाराने तिथे जाऊन सुमारे ३६७ लोकांना धान्य वाटप करून त्यांची मदत केली. तसेच तिथल्या लोकांच्या जनावरांसाठी पशु खाद्य स्वरुपात केलेली मदत करून परिवाराने माणुसकीचे एक मोठे उदाहरण दिले.

तसेच तिथल्या लोकांसाठी पुस्तक, खेळणी आणि कपडे गोळा करून त्यांना दान करण्यात आली.

तिथे मिळालेली लोकांची आपुलकी आणि प्रेम हेच परिवारातल्या लोकांसाठी त्यांच्या मेहनतीची पावती होती.

युवा जागृती

तंबाखू, गुटखा, दारू, सिगरेट ई. व्यसने लागून भरकटत चाललेल्या तरुणाईला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न व युवा पिढीला योग्य मार्ग दाखवण्याचे काम आम्ही निश्चितच करू अशी ग्वाही.

तसेच संघर्ष बरोबर जुळलेल्या तरुणाईला या सगळ्या व्यसनांच्या वाईट परिणामांबद्दल जागृत करून त्यांना या पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न संघर्ष नेहमीच करत असतो.

संघर्ष कट्टा

संघर्ष पथकामध्ये जी बेरोजगार मुले आहेत त्यांच्यासाठी एक छोटासा उद्योग धंदा म्हणून चालू केलेला हा आमचा संघर्ष कट्टा.

हा फक्त एक मजा मस्ती करण्यासाठीचा कट्टा नसून आम्हाला चर्चा करण्यासाठी किंवा एकमेकांना समजून घेण्यासाठीचे एक ठिकाण आहे. संघर्ष कट्टा ही एक अशी जागा आहे, जिथे येणाऱ्या लोकांना संघर्ष विषयीची माहिती मिळते. तसेच भविष्यातील मराठी उद्योजग होण्याचे स्वप्न आम्ही या संघर्ष कट्ट्याच्या माध्यमातून जिव्हारी बाळगतो.

नेत्रदान

अंधांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी नेत्रदान करण्याचा संकल्प संघर्षने केला आहे. एका अंध व्यक्तीची भेट घेतली तेव्हा त्याने एक प्रश्न उपस्थित केला कि तुम्ही तुमचे डोळे बंद करून दहा पाऊले चालून दाखवा. डोळे बंद करताच हे किती अवघड आहे याची जाणीव झाली कि किती गरज आहे नेत्रदानाची, त्यामुळे नेत्रदानाची सोपी भूमिका आम्ही लोकांसमोर मांडतो.

संघर्ष फुटबाल

तरुणांनी खेळाकडे आकर्षित व्हावे म्हणून संघर्ष फुटबाल ची स्थापना करण्यात आली आहे. शारीरिक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष व खेळानिमित्त शिस्तीचे महत्व जाणून घेणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

नुसतेच शिक्षण-शिक्षण नव्हे तर उद्याचा अंतराष्ट्रीय खेळाडू घडवण्याची उमेद.

संघर्ष परिवाराने या क्षेत्रात घेतलेले पाऊल म्हणजे २०१३ मध्ये भरवण्यात आलेले 5-a-side सामने.

पोलिस मित्र

पोलिसांना सहकार्य करण्याचा उद्देशाने सांगवी पोलिस चौकी अंतर्गत आम्ही "पोलिस मित्र" पोलिसांना विविध कार्याद्वारे सहकार्य करतो. जसे की - रात्रीची गस्त, नाका बंदी, इत्यादी उपक्रमांमध्ये सहभागी होऊन कायदा व सुव्यवस्था राखण्याचा एक प्रयत्न करतो. वेळोवेळी वाहतूक नियंत्रणातही मदत करतो.

अनाथ आश्रमांना भेट

हडपसर जवळील गाडीतल येथे रस्त्यावर भीक मागणाऱ्या लहान लेकरांना एकत्रित करून सुरु केलेल्या आश्रमास आम्ही भेट देऊन या गरीब मुलांना कपडे व दिवाळीचा फराळ, मिठाई भेट देऊन, 'माझ्या राष्ट्राचे होणार तरी काय' हे पथनाट्य सादर करून एक प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाची मुख्य संकल्पना दिवाळीच्या दिवशी फराळ वाटप करून त्या अनाथ मुलांना सणाचा आनंद देण्याचा प्रयत्न केला आणि माई बालभवन या संस्थेस भेट देऊन अंध मुलांना धान्य व कपडे देऊन एक नवीन उमेद जागी करण्याचा प्रयत्न केला.

Memories in clicks


Created with flickr slideshow.


संक्षिप्त प्रस्तावना

संघर्ष ढोल ताशा पथक आणि सामाजिक उपक्रम ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. संघर्षची मानसिकताच वेगळी आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाला काहीतरी देणं लागतो.
हीच आमची मानसिकता....

"दोन हातात मावेल एवढेच आपले, बाकी समाजाचे" असे सुप्रसिद्ध अभिनेते मा. नाना पाटेकर यांचे विचार आम्ही नेहमीच जोपासतो. विविध पद्धतीने समाजाला मदत करून नवीन नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. मग तो रस्त्यावरचा अपघात असो वा रुग्णवाहिकेला मार्ग करून देणे असो, ह्या छोट्या छोट्या गोष्टींना आम्ही आमचे कर्तव्यच समजतो. आम्ही आमचे पर्यावरण दूषित होणार नाही याची पूर्ण काळजी घेतो. मग आमचे खिसे कचर्‍याने भरले तरी चालतील पण आम्ही पर्यावरणाला जपण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.

तरुण पिढीला एकत्रित करणे आणि त्यांना योग्य मार्गावर आणणे हा सामाजिक उपक्रमामागे मुख्य उद्धेश आहे.

आजी आजोबा

तुमचा सहवास लाभला आम्हास असा , जणु लोखंडाला परीसाचा स्पर्श जसा . ह्या विचाराने आमचा आजी आजोबांन बरोबरचा सुरू झालेला तो दोन दिवसांचा प्रवास हृदयस्पर्शी होता . त्यांच्या संपूर्ण आयुष्यातल्या खडतर प्रवासातून त्यांना थोडासा विसावा मिळावा हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न होता. मग तो एखाद्या आजोबांचा वाढदिवस साजरा करणे असो. त्यांचे फोटोज काढणे असो, कि मग त्यांच्या साठी केलेली ती मेजवाणी असो . एवढेच नव्हे, तर त्यांच्या बरोबर मनसोक्त गप्पा आणि त्यांच्या भावना समजून घेणं असो...

रक्तदान

गरजू व्यक्तींजवळ जाऊन रक्तदान करा, त्यांच्याशी रक्ताची नाती तयार करा. आम्ही पथकातील वादक व त्याच्या कुटुंबातील व्यक्ति यांच्या रक्तगटाची माहिती जमा करून अडचणीच्या वेळी, गरज लागेल त्या रक्तगटाच्या व्यक्ति रुग्णालयात उपलब्ध करून देतो.

गड संवर्धन

महाराष्ट्रचा ऐतिहासिक ठेवा म्हणजेच आपले गड. आपल्या या गडांची स्वच्छता राखण्याचा व कचरा न करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. गिर्यारोहणाला (Trekking) गेल्यावर आम्ही कुठेही कचरा होऊ देत नाही व असलेली अस्वच्छता आम्ही दूर करतो.

वृक्षारोपण उपक्रम

२०१५ : पथकाच्या वर्धापनदिनी जवळपास 30 हून अधिक रोपे लावण्यात आली.

२०१६ : संघर्ष पथकाच्या त्रितीय वाढदिवसा निमित्त रविवार दि. २६ जून सकाळी ६.३० वाजता वृक्षारोपण कार्यक्रम

हात मदतीचा

जुने कपडे, खेळणी. चपला, औषधे, जुनी पुस्तके, संगीत साहित्य इ. पद्धतीची देखील गरजू अनाथ आश्रमाला मदत करतो. पथकातील कोणत्याही वादकाचे घराचे साहित्य शिफ्टिंग असो, पथकातील अनेक ताई-दादा मदतीस धावून जातात.

नेत्रदान

अंधांचे जीवन प्रकाशमय करण्यासाठी आम्ही नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यासाठी आम्ही अनेक वादकांचे मरणोत्तर नेत्रदानाचा फॉर्म भरून घेतो.