ढोल पथक २०२१





श्री क्षेत्र नारायणपूर

१८/१२/२०२१ रोजी, सेवेस रूजू नारायणपुरी, दत्त माऊलीं चरणी...

कोविड नंतरची पहिलीच मोठी सुपारी. सुपारी नव्हे तर सेवा दत्त माऊलींची. प्रत्येक वर्षी श्री दत्त महाराज आपल्या संघर्ष ढोल-ताशा पथकाला सेवेची संधी प्रदान करतात आणि संघर्ष ढोल-ताशा पथक त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहत नाही. या वादनाची खूप वेगळी ओळख आहे. दत्त जयंती निमित्त अनेक गावातून, शहरातून ढोल पथके, झांज पथके, आणि विशेष म्हणजे टोल पथके सेवेसाठी येतात. येवढ्या सगळ्या पथकांसमोर वादन करणे ही खूप मोठी गोष्ट आहे. अतिशय वेगळ्या वातावरणात कोणत्याही वादकाचा जोश, ताकद कमी न पडता, पावलोपावली ती ताकद, जोश द्विगुणितच होत जातो. कोरोना नंतर बरेच दिवसांनी वादन करत असल्यामुळे प्रत्येक वादकामध्ये, उर्जा, उत्साह होता.

या सगळ्यामध्ये वादन सुरू होताच थोड्याच वेळात आपला ताशा सम्राट आप्पाच्या हातातून रक्त येऊ लागले. पण, आपल्या ताशा सम्राटाच्या हातून ताशा एक मिनीट देखील थांबला नाही.

Hats off to Appa and his dedication about his love for Pathak and art that he has...

आणखी एक मजेशीर आणि वादकाचं आपल्या वादनावर असलेले प्रेम दाखवणारी गोष्ट अशी की आपले अध्यक्ष शशी भाई टोल वादन करत होते आणि आपल्या प्रत्येक वादकाची आवडती टोन सुरू होती, निखिल टोन...

शशी भाई येवढे मग्न झाले होते टोल वादनामध्ये की त्याला टोन हळू झालेली कळलंच नाही, एवढा एक वादक वादनामध्ये मग्न झालेला. सुरभी ताई मागून हात लावून टोन हळू केली म्हणून सांगायला लागली पण दोन्ही हातामध्ये हातोडी घेऊन टोलशी दोन हात करणाऱ्या शशी भाईला थांबवणे मुश्किलच...

या वादनाच्या मध्ये एक अशी गोष्ट होते ज्याने सगळे वादक सुखवतात.

या वादनाच्या वेळेस सूर्यदेवता अतिशय प्रखर असते, पण त्यात एक सुखद गोष्ट अशी की हेलिकॉप्टरच्या सहाय्याने प्रत्येक वादकावर पुष्पवृष्टी केली जाते. अतिशय सुंदर आणि सुखद असतो तो अनुभव. त्यानंतर अगदी थोडावेळ म्हणजे मोजून दोन मि. प्रत्येक पथकाला त्याची कला दत्त माऊलींच्या समक्ष गाभाऱ्यामध्ये सादर करण्याची संधी मिळते. अगदी कमी वेळेमध्ये आपली कला प्रस्तुत करून आशीर्वाद घेऊन नारायणपूरच्या सेवेचा पहिला टप्पा पूर्ण होतो.

त्यानंतर भाविकांचा महाप्रसादाचा आस्वाद घेऊन झाला की होते सुरूवात दुसऱ्या टप्प्याची म्हणजे स्पर्धेची. या स्पर्धेमध्ये अनेक पथक, वादक आपली कला सादर करतात. यामध्ये अनेक पारंपरिक वाद्यांचा समावेश असतो. आणि अशा बहुसंख्य कलागुणांमध्ये आपल्या सगळ्या ताई-दादांनी मिळून अशी काही संघर्षची छाप सोडली, की त्या स्पर्धेमध्ये आपल्या संघर्ष ढोल-ताशा पथकाला २०२१ मध्ये मानाचं पहिलं पारितोषिक मिळालं...ते ही अण्णा महाराजांच्या हस्ते.!

बात अलग है...संघर्ष!

अनंत प्रणाम...नमन!

जय गुरूदेव दत्त!!