ढोल पथक २०१५

प्रवास २०१५

दोन मुख्य उद्दिष्ठ

1) नात्यांचे मजबूतीकरण

2) वादनाचा दर्जा उत्कृष्ट करण्याची संकल्पना

नविन सभासद नोंदणी ४, ५ दिवसात बंद करून, जुन्या वादकांच्या काही निवडक संघर्षमय व्यक्तिमत्वांना व काही नविन सभासदांना संधी दिली.

एक पथक पलिकडे परिवाराच नातं अजुन विश्वसनिय व दृढ करण्याची संकल्पना...!!!

सराव

२०१५ च्या बाप्पाच्या आगमनासाठी ‘संघर्ष’ ने १ ऑगस्ट २०१५ पासून ढोलताशा वादनाच्या सरावाला सुरुवात केली. संध्याकाळी ६ च्या ठोक्याला अनेक ताई दादा ढोल ची लाडकी गाडी पथकाच्या कार्यालयापासून सरावाच्या ठिकाणी ढकलत नेतात. आम्ही वादकांना कष्ट देत नाही पण त्याच्या वादनांची व कषटाची नेहमीच स्तुती करतो . म्हणजेच पातीला मेण लावणे , ढोलाच्या दोऱ्या आणणे , फुटलेल्या पातीच्या जागी दुसऱ्या पाती देणे , ढोल ताणने ह्यासाठी काही नेमके दादा नोहमीच आनंदाने कार्यरत असतात.

सरावाला बूट आणि ओळखपत्र (ID) नसेल तर वादन करायचे नाही , ह्या शिस्तीचे पालन पथकात नेहमीच केले जाते. सराव हा रस्त्यावर होत असल्याकारणाने गाड्यांच्या गर्दीतून वाचण्यासाठी व आमच्यामुळे वाहतुकीला अडथळा येणार नाही त्यासाठी ‘बरीकॅडे टेप’ चे पथकाने आयोजन केले आहे. रोजचा ४ तासांचा सराव सायं.६ ते रा.१० पण काही वादकांसाठी तो सायं.६ ते रा.१२ व पुढेही चालुच असतो. ढोलाची गाडी जागेवर लावणे व ढोल नीट ठेवणे. आपली टोलगाडी व टिपरू व्यवथित आहे का ह्याची पूर्ण काळजी घेणे.

वादनाबाबत टिपरू मेणावर बसत नसेल, थापी वाजत नसेल तर दादाचे दोनच शब्द ‘ढोल सोड’ वादनाच्या दर्ज्या बाबत तडजोड नाही, वादन ‘चाबूक’ झालाच पाहिजे. राहिला सातत्याचा प्रश्न तर आमचे अध्यक्ष स्वताः सायं.६ च्या ठोक्यावर पथकाचाओळखपत्र (ID) आणि अनिवार्य असलेला बूट घालून ढोलाजवळ सर्वांच्या स्वागतासाठी तयार असतात. त्याचप्रमाणे काही ताई आणि दादा वेळेचे पालन करतात. मग जोरदार पाऊस असो वा रणरणते उन असो "संघर्ष" हा थांबणार नाही. सराव तर होणारच.

मेगा सराव

रविवार… सगळ्यासाठी सुट्टीचा दिवस …

पण "संघर्ष" साठी नव्हे . रविवार म्हणले कि अजून जोरात वादन . द्विगुणीत झालेला उत्हास. मग तो उत्साह स.५ वाजता उठून सायं.६ वाजता पथकात हजर राहणे अन मग पुन्हा तेच टोलची व ढोलाची गाडी ढकलणे. सैल असलेला ढोलाचा देखभाल (maintenance) करणे आणि आपल्या वादकांसाठी अतिशय प्रेमाने बनवलेल्या चहा, वादन न थांबवता सगळ्या वादकांना देणे आणि तसेच मिडिया टीम चे ते अविरत प्रयत्न त्या एका क्लिक साठी …

सुर्य उगवताना पडलेला पहिला ढोलाचा ठोका, ताशाची काडी व टोलावर पडलेली हातोडी ही सुर्य माथ्यावर येईपर्यंत कानात गुंजत असते. मग तो वादक ७ वर्षाचा असो किंवा ताई असो. अवघ्या चहाच्या घोट्यावर ते लांब लचक अंतर न थांबता, न थकता तेवढयाच उत्साहात पार पाडले जाते. हे अंतर पार पाडत असताना सर्वात्त महत्वाचे आमचे वाॅलेंटीयर. जे वाहतूक नियंत्रण पासून, ढोलाची गाडी ढकलण्यापासून प्रत्येक वादकाला लागत असलेली लिम-लेट ची गोळी किंवा गुल्कोस अगदी भरवण्यापर्यंत चे खूप मोठे काम ते आनंदाने करत असतात.

अश्या प्रकारे ६ तासांची, ३ ते ४ कि. मी. अंतर कापल्या नंतर सहभोजनाचा आनंद खरच तो खूप मजेशीर असतो.

ओळखपत्र, Jersey वाटप

२०१५ चे ओळखपत्र एकदमच वेगळे आहे. त्याची डिझाईन आणि दर्जा हा व्यावसायीक पद्धतीचा आहे. त्याहून महत्वाचे म्हणजे ओळखपत्र वाटप करण्याची पद्धत हि एकदमच वेगळी होती. प्रत्येक वादकाला पुढे बोलाऊन त्यांना सन्मानित करून ओळखपत्र देण्यात आले. ही गोष्ट फारच वेगळी होती. शाळा, कॉलेज, व ऑफिस ह्यांचे ओळखपत्र हे अनिवार्य असल्याने घालावे लागतात. पण ‘संघर्ष’ चे ओळखपत्र घालताना एक वेगळाच अभिमान वाटतो, कारण त्या मागे एक वेगळेच प्रेम दडलेले आहे.

तसेच २०१५ ची Jersey वाटप करण्याचा सोहळा अदभूत होता. सर्व वादकांना वादन करताना मानाने Jersey वाटप करण्यात आली. Jersey चे स्वागत हे ढोलताशाच्या गजरात झाले. Jersey वाटप करताना सागर सर (अभिनेता) आणि अजिंक्य सर (विप्रो) उपस्थित होते. २०१५ च्या Jersey चे डिझाईन हे सर्वांना आकर्षित करणारी आहे. Jersey ला विप्रो, वोलिनी आणि शिवशक्ती फ़्लेक्स ह्या सर्वांची sponsorship मिळाली आहे. एवढेच नव्हे तर आमच्या लाडक्या ढोल ला पातिंचा पुरवठा देणारे यशवंतराव गुलाबराव नाईक हे नाव देखिल प्रेमापोटी Jersey वर झळकत आहे.

सुपारी - १ ला दिवस

१. गोखलेनगर - पुण्यातील गणेशोस्तव म्हणजे ढोल ताशा हे समीकरण हे तुम्ही जाणता परंतु त्यापलीकडे जाऊन काहीतरी हटके करण्याची वृत्ती आणि यातुनच स्फुर्तिस्थान छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे स्मरण करुन ह्या वर्षीच्या वादनाचा पहिला दिवस, स्थान - गोखलेनगर याठिकाणी यंदाही सलग दुस-या वर्षी संघर्षने वादन केले, ३० ढोल आणि ९ ताशांच्या गजराने वातावरण आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले, एकंदरीत धडाकेबाज सुरुवात झाली !

२. कुणाल आयकॉन - गणेशचतुर्थीची तयारी कुणाल आइकॉनमध्ये मोठ्या उत्साहात चालू होती. जसजसा तो दिवस जवळ येऊ लागला तशी बाप्पांच्या स्वागताची जबाबदारी "संघर्ष" कडे देऊन आम्ही मोकळे झालो. कारण मागच्या वर्षीच्या वादनाची धुंदी तशीच होती.
       आणि तो मंगल दिवस उजडला, लगबग चालू झाली. सोसायटीच्या वतीने संघर्षचे स्वागत मी करणार होतो. काही कारणामुळे मला पोहोचायला उशीर झाला. पण आपले ताई आणि दादा ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी जराही न कंटाळता पूर्ण तयारीनिशी हजर होते. आजच्या पथकचे नेतृत्व करणार होता आमचा हसमुख पण शिस्तप्रिय विनोद दादा.
       शिवार चौकापासून "बाप्पा मोरया" च्या जोरदार घोशात वादनाला सुरुवात झाली आणि सोसायटीच्या गेटपर्यंत संपूर्ण रस्ता कौतुकाने पाहणा-या गणेशभक्तांनी भरुन गेला. मला पथकातील प्रत्येक वादकाचा अभिमान वाटत होता.
       सोसायटीच्या गेटजवळ बापांच्या दर्शनासोबत "संघर्ष" च्या वादनाचा जोश अनुभवण्यासाठी प्रत्येकजण जमला होता. त्यांच्या अपेक्षेचा मान राखत ज्या जोमाने व जोशाने गेटजवळ वादन झाले त्याला तोड नाही. सोसायटीच्या अगदी मागच्या, शेवटच्या इमारतीतील रहिवास्यापर्यंत बापांच्या आगमनाची वार्ता पोहोचली. जणू शिवरायांचे मावळे तोफ डागुण विजयाची बातमी कळवत होते, असा भास मला झाला.
        गर्दीचा उत्साह पाहून वादकांना अजून जोश येत होता आणि जराही उसंत न घेता त्यांचे हात ढोल ताशावर पडत होते. लोक आनंदाने नाचत होते, वादकांचे कौतुक करत होते. जवळ जवळ दोन तास वादकांनी बाप्पांसाठी व त्यांच्या भक्तांसाठी आपल्या सर्वोत्तम वादनाची कला सादर केली. बाप्पांच्या स्थापनेनंतर १० मिनिटे स्थिर वादन झाले. ऐकणा-यांपेक्षा वादन करणारेच जास्त तल्लीन झाले होते. त्यांच्या चेह-यावर आनंद आणि समाधान दिसत होते.
        ज्याप्रमाने बाप्पांना निरोप देताना " पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणतो त्याचप्रमाणे " पुढच्या वर्षी लवकर या" असे म्हणून सर्वांनी पथकाचा निरोप घेतला. पण पथकाची तर ही सुरुवात होती. दोन महिने केलेल्या कष्टाची आणि सरावाची जोशपूर्ण पेशकश त्यांना आपल्या बाप्पांसाठी १० दिवस सादर करायची होती. प्रत्येक वादक ह्याच खुशीत होता.

ढोलावरची थापी, ताशावरची तररी,
ध्वजाची उंची, मोरयाची हाळी,
मित्राची मैत्री आणि ताई दादांची एकी,
हीच आहे ताकद "संघर्ष" कुटुंबाची...

३. कोरेगाव पार्क - कोरेगाव पार्कसारख्या पुण्याच्या प्रतिष्ठित परिसरात बाप्पांच्या आगमानासाठी झालेलं संघर्ष ढोल ताशा पथकाच वादन आणि शशी दादा कडून ऐटीत नाचवला जाणारा ध्वज हे म्हणजे Modern जगात मराठी संस्कृती अभिमानाने गुनगुनत होती. ढोल ताशाचा ताल, त्या नादात हरवलेले प्रेक्षक आणि टाळ्यांच्या रुपाने मिळालेली वादनाची पावती मन प्रसन्न करणारी होती.

४. रोज आयकॉन - गणपतीची सगळेच जन वाट बघतात.सगळी कडे मंगलमय वातावरण असते. आमच्या सोसायटीत गणपतीचे स्वागतच ढोल-ताशाने होते. सगळेजन या क्षणाची आतुरतेन वाट बघत असतो. ढोल-ताशाच्या नादाने जो उत्साह संचारतो ते सांगणच कठीण. सगळ्याचे पाय त्या नादावर थिरकतात. तो उत्साह बघण्यासाठी अगदी बाहेरचे लोक ही येतात. गेले दोन वर्षापासुन आमच्या कडे "संघर्ष ढोल-ताशा पथक" येते. त्याची उत्साह बघण्यासारखा असतो. कितीही सुपाय्रा पुर्ण केलेल्या असोत. पण प्रत्येक गणपतीचे स्वागत ते तितक्याच जल्लोषाण, आनंदान, उल्हासान करतात. आमचा गणपती तर "संघर्ष ढोल-ताशा पथका" शिवाय बसतच नाही ते समिकरणच झालय. आता वाट बघतोय त्यांच्या "आम्ही येतोय" या त्यांच्या फ्लेक्सची. म्हणजे cultural committee तयारीला लागते. रोज आयकॉन,सोसायटी चेअरमन श्री. विवेक नित्तरमारे

सुपारी - ३ रा दिवस

काटेपुरम चौक, सांगवी - बाप्पाच्या उत्सवात तिसरया दिवशी सांगवीच्या मध्यवर्ती भागात, काटेपुरम चौकाजवळ, नेताजी नगर तरूण मित्र मंडळ येथे स्थिर वादन करण्याची संधी पथकाला मिळाली. बाकी कितीही सुपारया असोत पण, स्थिर वादन करण्याचा उत्साह काही वेगळाच असतो. जागेवरच उचलले जाणारे सर्व वादकांचे ढोल, टोलवर पडणारया हातोडीचा ‌प्रत्येक ठोका त्याच उत्साहाची प्रचिती देत होता.

सुपारी - ५ वा दिवस

१. रोझवूड सोसाईटी - हा दिवस पुन्हा आला चिमुकल्यांचा डोक्यावरची टोपी सर्व काही सांगुन जात होती. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. चिमुकल्यांचा चिलबिलाट सगळीकडेच दिसून येत होता। संघर्ष चा ढोल ताशा पाहताच सर्वजण जणू कुतुहलानेच पहायला लागले ,त्यांचे प्रेम त्यांच्या चेह-यावरुन दिसत होते. बाप्पाला एवढ्या मोठ्या संख्येने आलविदा करण्यासाठी रोझवूड मधले जणू सुसज्ज झाले होते. संघर्ष वरच त्यांच प्रेम द्विगुणित झाले होते. आता नुसताच आवाज!!! काही जणांच्या डोळ्यात बाप्पांना शाही थाटात शास्त्रबद्ध पद्धतीने निरोप द्यायचा आनंद होता तर काहींच्या डोळ्यात त्यांच्या बाप्पा सोडून जाणार याच दुःख होते.......

२. पार्क स्ट्रीट सोसाईटी - पार्क स्ट्रीट सोसाईटी मधे दुसरे ढोल ताशा पथक समोर असतांना त्यांच्या पेक्षा सुरेख व उत्कुष्ट वादन करण्याचा अनुभव आला आणि आठवते ते आमच्या कित्येक ताई दादांनी केलेलं बेधुंद वादन आणि त्यांचा जोष........ Power of Unity इथेच कळाली.....

सुपारी - ६ वा दिवस

१६ नंबर, थेरगाव - थेरगाव परिसरात सातव्या दिवशी सकाळी 10 च्या सुमारास झालेल संघर्ष ढोल ताशा पथकाच वादन आणि बाप्पांची विसर्जन मिरवणुक.... अवघ्या २० ढोल ,५ ताशांच्या जोरावर केलेलं अफलातून वादन आणि विनोद दादाचे नेतृत्व.... ढोल ताशाच्या वादनावर आकाशाला साद घालणारा आमचा भगवा ध्वज दिमाखात फडकत सर्वांचीच मन जिंकत होता....!

सुपारी - ७ वा दिवस

काटेपुरम चौक, सांगवी - आठवत आम्हाला ते सांगवीच्या रस्त्यांवर बापांच्या विसर्जन मिरवणुकीत आम्ही केलेलं वादन...
विसर्जन मिरवणुक म्हणजे वाईट वाटत तर होतच पण तरीही त्यांना निरोप द्यायचा होता आणि तो आम्ही आमच्या वादनाच्या सहाय्याने उत्साहात, आनंदात दिला पुन्हा पुढच्या वर्षी परत येण्यासाठी.......

सुपारी - ९ वा दिवस

बिजापुर – ढोल ताशा संस्कृती फक्त पुण्यापुरती मर्यादित न राहु देता दुस-या राज्यांमधे पोहचवण्याची पथकाची धडपड वर्षभर चालू असते, गतवर्षीच्या जोरदार वादनामुळे कर्नाटक राज्यात बिजापुर याठिकाणी पुन्हा एकदा वादनाची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोने करत वादन केले गेले आणि बिजापुरकरांनी एका नयनरम्य सोहळ्याचा अनुभव घेतला !

सुपारी - ११ वा दिवस

१. हैदराबाद - बिजापुरकरांची मन जिंकल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि संघर्षचे मावळे हैदराबाद मधे दाखल झाले ! प्रत्येक वादनाची नशा, तिथले वातावरण इ. वेगळेपण असताना वादन उत्तम करणे हेच आम्हाला माहिती अशा जोशात हैदराबाद मधे वादन केले गेले, या ठिकाणच्या लोकांनी एक नयनरम्य सोहळा पाहिला आणि त्याची पावती उपस्थितांच्या हसतमुख चेह-यांनी आणि सुखावलेल्या नजरांनी दिली.

२. औंध - ज्या वेळी साठ वादकांची फाैज हैदराबाद येथे लढत होती, त्याच वेळी बोपोडीच्या xxxx सोसायटीत ज्यांना तीन राज्यांच्या दाैरयावर जाता आले नाही ते सर्व वादक ढोल ताशांवर आपला राग धमाकेदार वादनाच्या स्वरूपात काढत होते. फक्त दहा वादक असले तरी, ताई दादांचा उत्साह आस्मानाला भिडणारा होता. प्रतिक दादाच्या अनुपस्थितीत दिशा ताईने केलेलं आयोजन आणि नेतृत्व वाखाणण्याजोगं होतं.

सुपारी - १२ वा दिवस

छिंदवाड़ा ( मध्य प्रदेश ) - स्फुर्तिस्थान छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे स्मरण करुन ज्या प्रवासाची सुरुवात पुण्यातील गोखलेनगर पासुन झाली, त्या प्रवासाचा यावर्षीचा अंतिम टप्पा म्हणजे मध्यप्रदेश, इथे झालेल्या जबरदस्त वादनामुळे सर्वांच मनोबल उंचावल गेले आणि उपस्थितांनी या आगळ्यावेगळ्या नशेचा मनमुराद आनंद लुटला आणि मनापासुन दादही दिली !!

२०१५ निरोप समारंभ

सालाबादप्रमाणे यंदाही वादकांच्या सत्काराची वेळ येऊन ठेपली, थोडसं हटके करण्याची प्रव्रृत्ती असल्यामुळे प्रथम वर्षी मालवण, द्वितीय वर्षी लवासासारख्या उत्कृष्ट ठिकाणी आणि यंदा निसर्गाच्या सानिध्यात फलटणला हा समारंभ सोहळा घेण्याचा पथकाने निर्णय घेतला!

वर्षभर वादकाने केलेल्या संघर्षाला सलामी म्हणुन पथक सर्व वादकांचा योग्य सन्मान करण्याचा पथकाचा नेहमीच प्रयत्न असतो, ह्या सन्मानाच मोल फक्त एक वादकच समजु शकतो हे संघर्षच चांगल्या पद्धतीने समजते !

दिनांक - ३१/०७/२०१६ ला आपल्या संघर्ष पथकाचा गणेश उत्सव २०१५ चा फेरवेल फलटण येथे निसर्गरम्य वातावरणात पार पडला...

अशा या निसर्गरम्य वातावरणात आलेल्या सर्व पाहुने मंडळी चा विशेष आभार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.. पथकातील सर्व सभासदांचा शंभुमुद्रा(पेंडल) देऊन सन्मान करण्यात आला...सन्मान चिन्ह,अनमोल क्षन, विशेष कार्यालय,आधार स्तंभ,सर्वोत्कृष्ट पुरस्कार,Always There पुरस्कार,संघर्ष पुरस्कार,या पुरस्कारानी संघर्ष सभासदांचा सन्मानीत करण्यात आले...

गणेश उत्सव २०१५ चा *संघर्ष पुरस्कार* ग्रेट अंकुश पवार ला देण्यात आला.