ढोल पथक २०१४

Memories in Clicks


Created with flickr slideshow.


प्रवास २०१४

प्रवास २०१४ चे मुख्य उदिष्ट

शिस्त, ताई दादा संस्कृती, विश्वास.
हीच ती संकल्पना

थोडक्यात आम्हाला शाळा, कॉलेज, ऑफिसमधे व्यस्त असलेल्या अनेक लोकांना आम्हाला एकत्र अनायचं होतं, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यास आम्ही समर्थ होतो. ज्यांना ढोल ताशा पथकात वादन करायचं होतं पण पुरेसा वेळ नव्हता, अशा व्यस्त लोकांसाठी संघर्ष ढोल ताशा पथक हा पर्याय होता.

अशा व्यस्त लोकांना त्यांची नविन ओळख करून द्यावयाची ही आमची संकल्पना. तसेच असा एक परिवार करून "सज्जनाची टोळी" म्हणजेच अशा लोकांना सामाजिक कार्यासाठी वळवन्याची आमची संकल्पना.

इंग्रजी मधे human bonding म्हणतात ना तेच आम्हाला करावयाचे होते. माणसाला माणसाची ओळख करून द्यावयाची होती. संघर्ष ढोल ताशा पथक हे एक होतं. छोट्या गोष्टींमध्ये आनंद, अपेक्षांचे ओझे कमी करून एक आयुष्य जगल्याच समाधान प्रत्येकाच्या हृदयी असल पाहिजेत ही संकल्पना. अशा प्रकारे अनेकांच्या आयुष्यात तेज, प्रगती, नवी उमंग निर्माण करायची संकल्पना.....

सुपारी - १ ला दिवस

१. गोखलेनगर , (एफ सी रोड)- ५० ढोल चे वादन, ८०-९० संघर्ष ढोल ताशा पथकाचे सभासद, पुणेकर रसिकांना कडक वादणाने मंत्रमुग्ध केले. त्यांना थांबून आमचा गजर ऐकण्यास भाग पाडले .
२. कुणाल आयकॉन - गोखलेनगर सोबतच समांतर मिळालेली अजून एक सुपारी, संघर्ष ढोल ताशा पथक पुण्यामध्ये एकाच वेळी २ ठिकाणी.
३. शुभश्री वुड्स - जेव्हा आम्ही ढोल गाडीमधून बाहेर काढले तेव्हा ते पूर्ण भिजलेले होते, तरी आम्ही थांबलो नाही. आम्ही इतक्या धो धो पावसात देखील ताडपत्री चा आधार घेऊन अत्यंत सुरेख पणे वादन केले. आमच्या या वादनाचे प्रत्यक्षदर्शी आहेत शुभश्री वुड्स चे रहिवाशी .
४. रोज आयकॉन - आमच्या शशिकांत दादाच्या सोसायटी मध्ये वादन केले. हा आमच्यासाठी एक जोशपूर्ण वीजपुरवठा होता.
५. हिंद मित्र मंडळ - इथे आम्हाला दुसर्‍या वर्षी देखील वाद्नासाठी बोलावले गेले. हाच आहे आमचा संघर्ष आणि आमच्या सुरेख वादनाची अस्सल पावती.

सुपारी - ५ वा दिवस

१ - अथर्व मार्केट - पुन्हा एकदा संघर्ष ढोल ताशा पथक कार्यालयाच्या शेजारी.... पिंपळे सौदागर
२. पार्क स्ट्रीट - इथे खरा संघर्ष झाला ..... आमच्या समोर दुसरे एक पथक.. आणि आम्ही जिंकलो. आणि हाच आहे आमचा संघर्ष.
३. हिंजवडी - इथे पुन्हा एकदा दोन विभाग झाले. परंतु वादनामध्ये कुठेही तडजोड नाही.
४. रोज लँड - इथे आम्हाला दुसर्‍या वर्षी देखील वाद्नासाठी बोलावले गेले. हाच आदर आम्ही कमावला आहे.

सुपारी - ७ वा दिवस

१. धनराज पार्क - आमचे वादन धनराज पार्क मधील रहिवाश्यांनी हृदयात जतन करून ठेवले
२. बोडकेवस्ती , हिंजवडी - खूप पाऊस पडत होता, तरीही किंचित ही न डगमगता वादन सुरू ठेवले व रसिकांना कडक वादणाने मंत्रमुग्ध केले
३. श्री गणेश सार्वजनिक - आपल्या स्वत: कॉलनीचा बाप्पा, जेथे आम्ही आमचा संघर्ष सुरु केला, जो आमचे संरक्षण करतो
४. सांगवी - शितोळे नगर मध्ये वादनासाठी आमंत्रित करण्यात आले. इथे आम्हाला गणरायाने प्रेरणा दिली
५. चिंचवडगाव - पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, पुन्हा एकदा आमच्यासाठी आदरयुक्त क्षण

सुपारी - ९ वा दिवस

बिजापूर, कर्नाटक
पहिल्यांदा शेजारी राज्यामध्ये वादनासाठी प्रवेश. ऐतिहासिक वादन. ६ तासांहुन अधिक वेळ, ५ किलोमीटर्स पेक्षा अधिक अंतर, ५० ढोल, शंभर पेक्षा आधिक संघर्ष ढोल ताशा पथकाचे सभासद. थोडक्यात आपली मराठी संस्कृती शेजारी राज्यामध्ये पोहोचवली. अत्यंत मोठा क्षण संघर्ष ढोल ताशा पथकासाठी.

सुपारी - १० वा दिवस

उमरगा, महाराष्ट्र
कर्नाटक गाजवून महाराष्ट्रात परत आल्यावर फक्त काही तासातच उमरग्यात पुन्हा जबरदस्त वादन. या सुपारीचं वेगळेपण म्हणजे चौकात दहा ताशावादक ढोलवर उभे राहुन वादन करत होते.

सुपारी - ११ वा दिवस

१) द्वारका रेसिडेंसी : रात्रभराच्या प्रवासाच्या दगदगीने किंचितही न दमता प्रत्येक वादकाचा वाजणारा कडक ठोका अंगावर शहारे आणत होता.
२) धनकवडी: आजपर्यंतच्या पथकाच्या वादनाच्या इतिहासात मिळालेला सन्मानातील तुरा असा या वादनाचा उल्लेख केला तर वावगे ठरणार नाही. मिरवणुकीत पालखीतला गणपती सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
३) बोपोडी: पथकाच्या सलग दुसरया वर्षाच्या वादनापैकी आणखी एक.. वेगळाच हुरूप ... मुसळधार पावसात पाती भिजल्याने ड्रम वर उचललेल्या नाशिक ढोलची आठवण आज पण ताजी आहे.
४) रेंज हिल्स: पहिल्यांदाच आपण अापल्या दोन्ही टोलचा वापर मिरवणुकीत केला अाणि त्या आवाजासमोर D.J. सुद्धा झाकोळून गेला .... पारंपारीक वादन विरूद्ध आधुनिक संगीत ....

सुपारी - १५ वा दिवस

वसई नाका, मुंबई
मुंबई मध्ये आम्हाला जरा जास्तच संघर्ष करावा लागला .वादकांच्या भोवती दोरी बांधून त्यांना संरक्षण द्यावे लागले कारण मिरवणूक पाहणारे प्रेक्षक वादन ऐकून भान हरपून बेधूंद होऊन वादनाचा आनंद घेत नाचत होते .

नवरात्र: पहिला दिवस

गणेश पेठ , पुण्याच्या हृदयात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जिथे वादन संस्कृती मनापासुन जोपासली जाते, अशा पुण्यनगरीत वादन करायला एक वेगळाच ऊत्साह आला होता. पुणेकरांची मनसोक्त मिळालेली दाद हृदयात घर करून राहिली.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती: आकुर्डी , प्राधिकरण

खुप दिवसाच्या विश्रांतीनंतर झालेल्या वादनात तर वादकांना थांबवणे अवघड झाले होते. बाप्पाला दिलेल्या निरोपानंतर प्रत्येक जण जणू याच क्षणाची वाट पहात होता.

वोडाफोन इव्हेंट

पथकाच्या इतिहासात प्रथमच एका व्यावसायिक कार्यक्रमात सहभाग. संघर्ष चे खर्या अर्थाने व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण.

हरियाणा

कर्नाटकानंतर परत एकदा दुसर्या राज्यात जवळपास हजार किमी. चा ३० तास प्रवास करून पथकाने आठ तासाचं जोरदार वादन करून हरियाणाच्या प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडलं. तिथल्या आयोजकांनी आपल्या ताईंसाठी वापरलेले " पैयो पैयो की छोरी किलो किलो के ढोल" हे वाक्य त्यांनी केलेल्या जोरदार वादनाची प्रचिती देते.

२०१४ निरोप समारंभ

२०१४ चा निरोप समारंभ हा एक अदभूत सोहळा, एक वेगळाच सोहळा एक वेगळे बक्षीस वितरण समारंभ. अन असा अदभूत सोहळा ‘लवासा इंटरनॅशनल कनवेन्शन सेंटर’ लवासा दासवे येथे पार पडला.

जे वादक मागील काही महिन्यान पासून ‘संघर्ष’ साठी तहान भूक, झोप, घरदार विसरून संघर्ष करत होते. या काळात पथक म्हणजे जणू त्यांचे घरच झाले होते. अश्या वादकांच्या पथक प्रेमाची छोटीशी दखल हाच या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता.

सांगताना उर भरून येतो कि भारतातील क्रमांक दोन असलेल्या इंटरनॅशनल कनवेन्शन सेंटर लवासा दासवे येथे हा भव्य सोहळा पार पडला. बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटले कि ढोलताशा पथकाचा सोहळा अश्या ठिकाणी??? हो....कारण हे ‘संघर्ष’ ढोलताशा पथक आहे !!! कारण आम्ही वेगळ्या पद्धतीने विचार करतो ....अन आमची मानसिकताच वेगळी....

ह्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी हे दुसरे तिसरे कोणी नसून आमचे पालकच होते. सौ. कविता तेंडूलकर ,सौ संगीता आगवणे ,सौ संध्या राय ह्या अध्यक्ष पदी होत्या. कार्यक्रमाला मा. भूपेश कुमार (असिस्टंट वी. पी., टुरिझम लवासा कॉर्पोरेशन) आणि मा. सुभाषित दत्ता (सीनिअर मॅनेजर लवासा कॉर्पोरेशन) उपस्थित होते.

या कार्याकामाला २०० हून अधिक वेगवेगळ्या प्रकारातील सम्मान चिन्हांचे वितरण करण्यात आले. मानाचा ‘संघर्ष आधारस्तंभ’ हा पुरस्कार श्री विनोद काशिनाथ कापुरे यांना प्रदान करण्यात आला. सलाम तुझ्या वादनाला.

या अविस्मरणीय सोहळ्यात अनेकानी आपले मनोगत व्यक्त केले . नृत्य , गायन, नक्कालांच्या कार्यक्रमामुळे रंजकतेत अजुनच भर पडली. सर्वात महत्वाचे या कार्यक्रमात फक्त वादकच नाहीत तर त्यांच्या पालकांची प्रेक्षणीय उपस्थिती होती.

भावनांनी भारावलेला हा भावस्पर्शी सोहळा सर्वांच्या कायम स्वरूपी लक्षात राहील.