ढोल पथक २०१३

प्रवास २०१३

कसा सुरु झाला हा प्रवास ???
२६ जुन २०१३ रोजी संघर्ष करणाऱ्या एका आईच्या वाढदिवसा निमित्त सुरु केलेले ढोल ताशा पथक सौ. कविता उल्हास तेंडूलकर व तसेच सोबत वादन करणाऱ्या मावळ्यांच्या आईंना अर्पित.

२६ जून २०१३ दिवस एकादशीचा, सायंकाळची वेळ, सुमारे ७ वाजता. यशवंतराव गुलाबराव नाईक म्हणजे नाईक काकांकडून ढोल, ताशे, पाती, मेण इत्यादी सामान घेवून श्री गणेश सार्वजनिक ट्रस्ट मध्ये आम्ही दाखल झालो, मंदिरात आरतीची वेळ आणि आमच्या लाडक्या वाद्यांचे पूजन सुरु झाले, नारळ फोडून जय गणेशा, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या घोषणामुळे वातावरणात जणू एक युवकांच्या क्रांतीची सुरवात झाली होती.

आणि असा सुरु झाला हा "संघर्ष" मय प्रवास !!!

सुपारी

१ ला दिवस
- श्री गणेश सार्वजनिक ट्रस्ट
- हिंद मित्र मंडळ (विशालनगर)
- अजित मित्र मंडळ (माणकर चौक)

५ वा दिवस
- रोज वूड
- पार्क स्ट्रीट

७ वा दिवस
- प्राधिकरण
- कंफोर्ट झोन

९ वा दिवस
- भूमकर चौक
- विशालनगर

१० वा दिवस
- जय महाराष्ट्र मित्र मंडळ (बोपोडी)
- तुषार रेसिडेन्सी
- मॉंडेल कॉलनी