Blog

संघर्ष कोणाचा?? संघर्ष काय ??

माझे दैवत माझी आई कविता उल्हास तेंडूलकर व वडील उल्हास गणपत तेंडूलकर यांना या संघर्षच यश अर्पित!!!

जी ताकद मिळाली, जो संघर्ष त्यांनी केला त्याला शब्द नाही…. सर्व परिस्थितीत त्यांनी ठेवलेला विश्वास सागरा सारखा मोठा होता.
विश्वासा बद्दल त्यांनीच बोलावं
विश्वासा बद्दल त्यांनीच लिहावं
विश्वासा बद्दल त्यांनाच भेटावं

माझ्या आयुष्यातील एक संघर्ष!!!!

संघर्ष परिवार!!
संघर्ष चौक, जगताप डेअरी, पुणे, २७

ध्येय मंत्र

'संघर्ष' ढोल ताशा पथकाचा / ची सदस्य या नात्याने मी हि शपथ घेतो / घेते कि,

1. जन्मभूमी, मातृभूमी ,पुण्यभूमी, धर्मभूमी, कर्मभूमी तसेच स्वदेश, स्वराष्ट्र, स्वभाषा, स्वधर्म, स्वसंस्कृती च्या रक्षणार्थ व प्रतिष्ठेचा ध्यास - अभिमान मी माझ्या व इतरांच्या तन - मनात जगवेन.
2. पथकच माझे दुसरे कुटुंब असून मी पथकाच्या नियमांशी कटिबद्ध राहून मी माझे कार्य कर्तव्य, शिस्त, संवेदनशीलता, सेवाधर्म, स्नेहभाव, विनम्रता अंगी बाळगून राष्ट्कार्याचे माझे कर्तव्य मी पार पाडेन.
3. मानवता ही एकच जात समजून समस्त स्त्री - पुरुष, उच्च - नीच, गरीब - श्रीमंत सर्वांकडे न्यायदृष्टीने पाहीन. तसेच पशु - पक्षी, वृक्ष - लता - वेली यांकडून ज्ञान चेतना घेईन व त्यांचे रक्षण करीन.
4. आचार - विचाराने मी सर्वांसमक्ष नम्र, विवेकी, संवेदनशील, संयमी, राहीन. 'संघर्ष' पथकाचा / ची मी सदस्य असल्याचा मला अभिमान आहे.

'संघर्ष' मध्ये काय करणे अपेक्षित आहे
1. संघर्ष
2. संवेदनशीलता
3. संयमी
4. सेवाधर्म
5. स्नेहभाव
6. स्वाभिमान
7. संस्कृतीचे रक्षण
8. साधना
9. संघटन
10. सामर्थ्य

सागरासारखी जंगम मालमत्ता संघटनेत / पथकात आहे हेच संघर्षाच्या यशाचे प्रतिक आहे.

आमच्या पथकाची झालेली पहिली शूटिंग…

तसं तर ती फक्त एका गाण्यासाठी होती, पण पथक पहिल्यांदा कुठेतरी शूटिंग ला जाणार होते…. आणि ते ही सुखविंदर सिंग सारख्या मोठ्या गायकाच्या गाण्यासाठी, म्हणून सगळ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह होता. सगळेच अगदी थाटा - माटात तयार झाले आणि शूटिंग ला सुरुवात झाली. सगळेच कडक पांढऱ्या शुभ्र अश्या पोशाखात शूटिंगच्या सेट वर उभे राहिले.

थोडी भीती सगळ्यांनाच मनात होती कारण पहिलीच वेळ होती. महाराष्ट्र माझा ही गाण्याची सुरुवात ऐकून सगळ्यांना तरतरी आली. मनात असलेली भीती दूर झाली. असलेला nervousness दूर झाला आणि मग काय… मिनटा मिनटाला कट… कट… 'पुन्हा घ्या' 'रिटेक' सारखे शब्द जवळ - जवळ तीन चार तास आमच्या कानावर पडत होते. सगळे खूप दमलो होतो. नको नको झाले होते ते. पण कुठेतरी T.V. वर दिसू म्हणून कुणीही ढोल सोडायला तयार नव्हता. पण मज्जा म्हणजे पाच तास झाल्यावर जेव्हा Director ने सांगितले के आता फक्त १ मिनटांची शूटिंग झाली तेव्हा सगळेच खरोखर चिडले. पण तो Director ही कुठेतरी संघर्षच करत होता. ह्याची जाणीव प्रत्येकाच्या हृदयात होती आणि परत सगळ्यांनी सुरुवातीचा जोश आणला आणि जोशाने सगळ्यांनी गाण्याची शूटिंग पूर्ण केली.

खरंच अविस्मरणीय दिवस होता तो. आमच्या पथकातील वाटचालीचा….