फक्त ढोल पथक नाही तर एक परिवार !

सह्याद्रीच्या कुशीत जन्माला आलेला एक अजिंक्य छावा, ज्यांच्या जयघोषाने आजही अंगावर शहारे येतात. अवघ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात १७० पेक्षा जास्त युद्ध लढलेला आणि कधीही पराभूत न झालेला बलशाली धर्मवीर म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज .

संघर्ष ढोल ताशा पथकाच्या स्थापनेपासून संघर्ष हा निश्चितच होता. म्हणूनच छत्रपती संभाजी राजांच्या उभ्या आयुष्यातील संघर्षापासून प्रेरणा घेऊन आम्ही संघर्ष करण्यास सुरुवात केली. जेव्हा जेव्हा संकट उभे राहिले, तेव्हा तेव्हा छत्रपती संभाजी राजांना स्मरण करून संकटांना सामोरे जाण्याचे धाडस आम्ही करतो.

२६ जुन २०१३ रोजी संघर्ष करणाऱ्या एका आईच्या वाढदिवसा निमित्त सुरु केलेले ढोल ताशा पथक सौ. कविता उल्हास तेंडूलकर व तसेच सोबत वादन करणाऱ्या मावळ्यांच्या आईंना अर्पित.

नवचेतना चॅरीटेबल ट्स्ट तर्फे अनेक सामाजिक उपक्रम गेले काही दिवस राबवत असताना आज आम्हाला स्वतः च्या पायावर उभं राहिले पाहिजे याची उणीव वेळोवेळी भासत होती . ट्रेकिंग, दुष्काळ ग्रस्तांना मदत, युवकांसाठी कार्यशाळा असे साधारण १० ते १५ यशस्वी रित्या कार्यक्रम पूर्ण केल्यावर प्रत्येक वेळेला घरून शे दोनशे रुपये घेणे हे आता योग्य वाटत नाही कारण आमच्यासाठी आमच्या आई - वडिलांचा चाललेला संघर्ष, आता आम्हाला बघवत नाही. आम्ही पुर्णपणे नाही पण काही प्रमाणात शिक्षण घेता घेता आमचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करू म्हणून हे छोटे पाऊल.

आमच्या संघर्षाला देऊन तर पहा साथ …

ढोल पथक

या उपक्रमाचे मुख्य उद्धीष्ट युवकांना स्वावलंबी व एकत्रित करण्याचे असले तरी या द्वारे "युवा पिढीला योग्य दिशा देण्याचे काम आम्ही निश्चित करू अशी ग्वाही ."

कारण आजची पिढी व्यसनामुळे विनाशाच्या मार्गावर आहे तो मार्ग आम्ही बदलू इच्छितो.

नाही, नको, जमणार नाही, इत्यादी शब्द आमच्या DICTIONARY मध्ये नाहीत. आज आपल्या समोर ढोल ताशांचा गजर करण्यासाठी संघर्ष ढोल ताशा पथकाचा प्रत्येक सभासद आपल्या आयुष्यात एक संघर्ष करत आहे.

आज एक पथकाच्या पलीकडे जाऊन आम्ही एक परिवार म्हणून एकत्र आहोत .

आमच्या संघर्षाला देऊन तर पहा साथ …

सामाजिक कार्यक्रम

भारतात आजही गरीब आणि श्रीमंत ही दरी वाढतच चाललेली आहे. देशातील जवळ-जवळ ३०% जनता एकवेळच्या जेवणापासून वंचित आहे. तसेच समाजातील अनेक घटक शिक्षणापासून वंचित आहेत. अंध-अपंग, अनाथ, निराधारांच्या विविध संस्थांना लोकसहभागातून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इ. मुलभूत गरजा मिळवून देण्याचे कार्य "नवचेतना चॅरीटेबल ट्रस्ट" करत असून भविष्यात देखील करणार आहे. देशातील या समस्यांबरोबर पर्यावरण रक्षण, स्त्री भृणहत्या, बेरोजगारांसाठी रोजगार आणि सामाजिक बदलांसाठी धडपडणाऱ्या विविध संस्थांना मदत करण्यासाठी "नवचेतना चॅरीटेबल ट्रस्ट" सातत्याने प्रयत्नशिल राहणार आहे. "देशाला, समाजाला समृद्ध करण्यासाठी सदैव कार्य करत राहणे.!" या ट्रस्टच्या उद्धीष्ठपुर्तीसाठी आम्हास आपले सहकार्य हवे आहे.

Contact : +91 9028 724992 / +91 9175 010109